मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.८रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वानराणे धुमाकूळ घातला त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानकच शाळेच्या प्रणांगणामध्ये वानराने उडी मारल्याने शालेय विद्यार्थी घाबरून गेली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गात पाठवून दिले. शालेय शिक्षकांनी वनराचा बराच पळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही गेला नाही.तरीसुद्धा हा वानर शाळेमध्येच फिरत होता. दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा त्यांनी शाळेतील मुलींच्या व कर्मचाऱ्यांवर मागे लागला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी घाबरून गेली. दि.७ रोजी सकाळी ९:१५ मिनिटाला शाळेच्या गेटवर अभी असलेल्या पहिलीच्या मुलीच्या मागे लागल्याची घटना घडली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मुगट गावात वानराणी धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये एक बालिका गंभीर जखमी झाली होती तर गावात अनेक ठिकाणी या वानराच्या मुलांच्या, स्त्रियांच्या मागे लागण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत परंतु या वानराचा कायमचा बंदोबस्त करण्यात वन विभाग कमी कर्मचाऱ्याअभावी या कमी पडत आहे.
शाळेतील मुख्याध्यापक मुंगरे यांनी वानरांचा शाळेतील धुमाकूळ पाहुन वनरक्षक यांना फोन करून घटना सांगितले काही वेळातच वनरक्षक कवळे यांनी घटने गांभीर्याने घेऊन आपल्या टिमसह सापळा घेऊन शाळेच्या परिसरात दाखल झाले होते.तो पर्यंत वानराने शाळेतुन पळ काढला. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांनी काही सुचना दिल्या.
वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा