मुदखेड प्रतिनिधी / कैलाश पाटील
दि.२३ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी आज मराठा आरक्षण संदर्भात दि.२९ऑगस्ट २०२५ रोजी जरांगे पाटील यांचे मुंबई येथे बेधडक मोर्चा निघणार असून मराठा आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व लोकात जनजागृती करण्यासाठी मुगट सर्कलमधील सर्वपक्षीय मराठा बांधव एकत्र येऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी मोटर सायकल रॅली ची सुरुवात मुगट पासून आमदुरा, शिखाचीवाडी, रोहीपिंपळगाव,वसंतवाडी, दरेगाव, खुजडा, टाकळी, चिलपिंपरी, महाटी, माळकौठा, कामळज, देवापुर, शंखतीर्थ, वासरी,या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन मुंबई येथे निघण्यास सर्वांनी तयारी करावी,
आपल्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे असे रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.सर्व गावातील लोकांनी 'एक मराठा लाख मराठा',' जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' 'आता कुठे जायचं मुंबईला जायचं!, 'सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे' 'राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगे सोयरे' अशा घोषणा देत रॅलीला स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. शेवटी आमदुरा येथे राष्ट्रगीताने मोटरसायकल रॅलीची सांगता करण्यात आली.
यासाठी मुगट सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा