मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील
मुदखेड तालुक्यातील कामळज गावचे मराठा बांधव दिः २९ ऑगस्ट पासुन आझाद मैदान मुंबई येथे मा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसगट ओबासी मधून आरक्षण मिळावे, शिंदे सरकारने या पूर्वी वासी येथे सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच अश्वासन पाळावे यासाठी दिं २७ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी ते मुंबई महामोर्चा काढला.
यासाठी पहिल्या दिवसापासुन कामळज ता. मुदखेड येथील शेकडो बांधव आपल्याला आरक्षण मिळाव, लेकराबाळच भाविष्य खुलाव,आपल्या जीवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस याची भिती न बाळगता मा मनोज जरांगे पाटीला यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. मनोज जरांगे पाटलाच्या आदेशाच पालन करीत टप्प्याटप्प्याने मराठा बांधवाची ये जा चालू होती .जो पर्यत जरांगे पाटलाच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यत कामळज गावकरीही माघार घेणार नाहीत असा ठाम विश्वास बाळगुन आंदोलनात सहभागी झाले होते .
आज सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या व अन्नत्याग आंदोलन मागे घेतले यावेळी उपस्थित कामळज मराठा मावळ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर विजयी जल्लोष साजरा केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा