सांस्कृतिक सभागृह लोकार्पण व दलित वस्ती सी. सी. रस्ता भूमिपूजन
मुदखेड / तालुका प्रतिनिधी
दि. १२ रोजी मुदखेड तालुक्यातील कामळज येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड मा. ना. अशोकराव चव्हाण साहेब व माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शना नुसार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. गोविंदराव शिंदे नागेलीकरांच्या शुभहस्ते मुगट जिल्हा परिषद गटातील कामळज या गावात भुमी पुजन व लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक मा भिमराव पा. कल्याणे, पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी मा. पिंटू पा. वासरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांस्कृतिक सभागृह लोकार्पण ०९ लक्ष , दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत सी. सी. रस्ता भूमिपूजन ०८ लक्ष , हाँयमॅक्स लाईट ०३ लक्ष रुपये निधी मिळाला आहे.या निधीतून गावातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे.
काँग्रेस कडून मुगट जिल्हा परिषद गट व बारड जिल्हा परिषद गटातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे प्रगतीपथावर चालू आहेत. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर येऊन ठेपली आहे.
त्याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी चक्रधर खानसोळे, उपसरपंच गजानन पांचाळ, माजी सरपंच नागोराव खानसोळे, ग्रामपंचायत सदस्य माधवराव खानसोळे, दिगंबर खानसोळे, शशीकलाबाई खानसोळे,रुस्तुम खानसोळे, सुमनबाई कोकरे, ग्रामविस्तार अधिकारी एकनाथ कदम, गौतम कोकरे, व गांवातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा