मुदखेड / तालुका प्रतिनिधी
दि.१५ रोजी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७५वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
स्वातंत्र्यदिवसा निमित्य आज गुरुकुल इंग्लिश स्कूल आमदुरा व शिकारघाट येथे भारतीय सैन्य दलातील सैन्यामध्ये कार्यरत असलेले गणेश पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात..आज त्यांनी भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा उपक्रम राबविला त्यामुळे यांची सगळीकडे चर्चा आहे.
शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रा. चंपती पवार, पठाण सर, अँड. गजानन पवार, अँड. नवनाथ पंडित,दत्ता पवार सरपंच शीतल गोरकवाड, उपसरपंच युवराज पवार व मारोती पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पवार, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गावातील माजी शंकरराव पवार, माजी सरपंच पांडुरंग पवार व रामदास पवार, बालाजी पंडित, तलाठी प्रवीण होंडे साहेब, बिसंनसिंग आमदुरेकर, दामाजी पवार, संभाजी पवार, माधव पावर, अवधूत पवार, आनंद पवार, सुदाम पवार, अरुण पवार, गंगाधर पवार, अर्जुन पवार, सुरेश पवार, अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व प्रतिष्ठीत नागरिक या वेळी ध्वजारोहणासाठी उपस्थीत होते..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा