गुरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी दूता कडून मार्गदर्शन
मुदखेड / तालुका प्रतिनिधी
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत गीताई ह्यूमन काईडं ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय आमखेड येथील कृषी दूतांनी अनिकेत अंबादासराव इंगोले या विद्यार्थ्यांनी चिकाळा परिसरातील शेतकऱ्यांना गुरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याकरता मार्गदर्शन केले.
यामध्ये त्यांनी चाऱ्यावर युरिया प्रक्रियेचा फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले वाढलेल्या चाऱ्यामध्ये पचनास कठीण असलेले हे घटक तसेच तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिने चे प्रमाण खूप कमी असते प्रक्रिया केलेल्या कार्याचे प्रथिनाचे प्रमाण १.१ ते ३/४ टक्केपर्यंत वाढ होते क्षमता २० ते ३० टक्क्यांनी समतेच्या घटकांमध्ये वाढ होते त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात देखील वाढ होते. त्यांच्या शरीरात वाढ प्रजननक्षमता ही सगळी राखली जाते अगदी कमी खर्चात कमी वेळात जनावराची पौष्टिकता सहज आहार उपलब्ध करून देता येतो शेतकऱ्यांना घेऊन या प्रक्रियेत प्रात्यक्षिक करून दाखविले.
युरिया प्रक्रियेसाठी या चार टक्के युरिया वापरात याचा जनावरांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी तिथे शेतकरी प्रकाशराव देशमुख, सुरेशराव देशमुख ,अशोकराव देशमुख, अनिल देशमुख, शिवाजी देशमुख, चक्रधर माने ,हनुमंत देशमुख ,अमोल देशमुख, संभाजी कोकणे, शंकर कोकणे ,पप्पू देशमुख ,ज्ञानेश्वर कोकणे, किशोर वडजे आदी शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल मुराई कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी.टी.बोरकर, मार्गदर्शन प्रा.आर.एस.डाखोरे सर यांचे व इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा