मुदखेड तालुका / प्रतिनिधी अतीक अहेमद
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बारड येथे शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिवसेना नेते बारड ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बारड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबीरास भोकर मतदारसंघातील युवकांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
बारड सर्कल मधील शेतक-यांच्या हितासाठी फ्रुट कंपनी, तसेच व्यापारी व शेतकरी यांच्या साठी वेगवेगळया मालाचे भाव फलक साठी एल.ई.डी याचे उदघाटन सोहळा हिंगोलीचे खासदार आणि शिवसेना नेते खा. हेमंतभाऊ पाटील, नांदेड उत्तर चे आमदार बालाजीराव कल्याणकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कवळे यांनी केले
यावेळी जिल्हा प्रमुख नांदेड दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख नांदेड उमेश मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख भोकर दत्ता पाटील पांगरीकर, उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य देगाव बबन बारसे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, शिवाजीराव किन्हाळकर, बालाजी कल्याणकर, परमेश्वर पांचाळ, विश्वभर पवार, मुदखेड तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, पंचायत समिती सदस्य पिंटु पाटील वासरीकर, संतोष कापटे, भोकर चे अमोल पवार, युवराज पाटील, शहरप्रमुख सचिन चंद्रे,सचिन माने, यांच्या सह अदि प्रमुख उपस्थितीत होते.
मुदखेड तालुक्यातील अनेक खेड्यातील युवकांचा यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात आला
रक्तदान कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब देशमुख बारडकर, सरपंच प्रभाकरराव आठवले, विलासराव देशमुख, माणिक लोमटे, शिवाजीराव देशमुख , गजानन कत्रे, किशन देशमुख, कैलास पुलकुंटवर, प्रदीप देशमुख, विजय देशमुख,,शरद कवळे , गणपत शिंदे, दिपक पाटील , रितेश जैयस्वाल, प्रकाश देशमुख, आशिष देशमुख, मजहर शेख, आदीने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद जोंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास देशमुख यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा