नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेत श्री राहुल गांधी यांची मुदखेड तालुका माजी सैनिक यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन व सैनिकाच्या अडचणी बाबत श्री राहुल गांधी यांना अवगत करून निवेदन दिले.
वन रँक वन पेंशन ही योजना मोदी सरकारने फक्त मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी मागील इतक्या वर्षात झालेली नाही व देशातील सरकारी कंपनी खाजगीकरणाच्या नावा खाली काही ठरावीक उद्योगपती यांना विकण्याचा केंद्राचा कुटीला डाव श्री राहुल गांधी यांनी मोडून काढावा असे निवेदन प्रत्यक्ष श्री राहूल गांधी यांना भेटून मुदखेड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे व राजाराम हळदे यांच्या नेतृत्वात मुदखेड तालुक्यातील २२ बाजी सैनिकांचे शिष्टमंडळ राहूल गांधी यांना भेटून निवेदन दिले आहे .
भारत जोडो यात्रे मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री डि पी सावंत साहेब व अमदार अमर भाऊ राजुरकर साहेब यांच्या सुचने वरून मुदखेड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा सैनिक फेडरेशन विभाग मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या नेतृत्वात मुदखेड शहरातील २२माजी सैनिक व जिल्ह्यातील इतर सैनिक यांना घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली.
या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे राजाराम हळदे तालुका अध्यक्ष देवराव चोदंते जेष्ठ माजी सैनिक प्रभु घोंगडे, देवीदास पवार,शशिकांत मोडवान, चंद्रकांत तेलंगे,प्रकाश पिन्नलवार,सुनील चोदंते, साहेबराव वने, विकास बल्फेवाड, बालाजी इबितवार, बालाजी गव्हाने, मारोती गुंठे, शेख फारूख ,रामसिंह राठोड, चाँद साहेब, साईनाथ राठोड आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा