सरेगाव जि.प.शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

   संपादक आशिष मुगटकर

जयंती :- सरेगाव येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेत महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करताना गावातील मान्यवर मंडळी,मुख्यध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका हे उपस्थित होते.

बारड / प्रतिनिधी

      मुदखेड तालुक्यातील  सरेगाव येथील जि.प.प्रा.शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांची जयंती साजरी करण्यात आली.

  गावातील मान्यवर  मंडळींच्या  हस्ते या महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोपिराज पा.कळणे,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री चक्रधर पा.कळणे,से.स.सो.चे चेअरमन श्री बालाजी पा.गिरे,मुख्याध्यापक श्री डी.एल.कदम,प्रा.प.शिक्षक तथा शिवव्याख्याते श्री  एम.टी.जाधव,प्रा.प.शिक्षक श्री बी.वाय.गरुडकर,श्री एम.एस.राउत,(स.शि.)श्री एस.जी.गैनवार(स.शि.)सौ.एस.एम.बाचा, श्री.जी.पी.शिरुरकर, अंगणवाडी ताई आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या