बारड मंडळाला विमा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे तालुका काँग्रेस कमिटी व बारड शेतकऱ्यांन कडून मागणी

 संपादक आशिष मुगटकर

चर्चा :- नांदेड येथील कार्यक्रमात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना केळी पीक विम्यातून बारड मंडळ वगळ्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुसकान होऊन विमा मिळाला नसल्याने मोठे नुसकान झाले असल्याने या शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळावा या विषयावर चर्चा करताना उत्तमराव लोमटे बारडकर,बंटी कांबळे .

बारड / प्रतिनिधी

    मुदखेड तालुक्यातील बारड मंडळाला हेतूस्पर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून विमा कपंनी कडून वगळण्यात आले असल्याने या परिसरातील  शेतकऱ्यांचे  नुसकान होवून विमा केल्म मिळाला नसल्याने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळवून देण्यासाठी मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी व बारड येथील शेतकऱ्यांन कडून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

     सन २०१९/२०मध्ये या मंडळातील शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात केळी विमा विमा कंपनी कडून मोठ्या प्रमाणात उतरवला होता या काळात वारा,तापमान मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या केळी बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे.

      परंतु विमा कंपनी ने तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. मुदखेड मंडळ, मुगट मंडळ या दोन मंडळाला विमा केल्म मंजूर केला असून तालुक्यातील बारड मंडळ वगळ्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा मिळाला नसल्याने मोठे नुसकान झाले असल्याने या शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळवून देण्याची मागणी यावेळी निवेदन देऊन केली आहे.

      यावेळी निवेदनावर मुदखेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार,पंचायत समिती उपसभापती आनंदराव गादीलवाड,काँग्रेस शहरअध्यक्ष माधव कदम,उत्तमराव लोमटे बारडकर,मैसाजी भांगे, राजाआप्पा कोतावार, प्रताप देशमुख, रोहीदास जाधव,भिमराव कल्याणे,केशव मुंगल, बंटी कांबळे, प्रभाकर सुर्यवंशी, प्रभाकर भिंगेवार, शेषेराव दंडे, धाराजी पवार, किशोर पिल्लेवाड,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या