केळी पीक विमा संदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बचत भवनात बैठक

 पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केळी पीक विम्या विषयी सविस्तर चर्चा.

शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडून केळीचा वीमा मिळान्याची केली मागणी.

संपादक आशिष मुगटकर

बैठक :- नांदेड येथील  बचत भवनात आयोजित बैठकीत केळी पीक विम्या विषयी आपले मत मांडताना शेतकरी प्रतिनिधी उत्तमराव लोमटे बारडकर, सोबत इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.

नांदेड प्रतिनिधी/आशिष कल्याणे

दि.५ रोजी नांदेड येथील जिल्हा नियोजन भवनात  जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती होती. बारड ,अर्धापूर येथील शेतकऱ्यांचा केळी पीक विमा बाबतच्या तक्रारी वर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना  केळीचा पीक वीमा  मिळान्याची आशा पल्लवीत झाली आहे.

 बारड व अर्धापुर परिसरातील केळीचे पीक घेवून, केळीचा वीमा भरलेले शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा   पीक विमा कंपनीने  शेतकऱ्यांना केळीच्या वीम्यापासुन वंचीत ठेवन्यात आले आहे. याबाबत अनेक मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी,बारड, अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या कडे, तसेच पीक विमा कंपनीकडे सुद्धा केल्या गेल्या. 

विमा कंपनीने यामध्ये केलेला अनागोंदी गैरकारभार हा पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांच्या निदर्शनाश शेतकऱ्यांनी यावेळी  आणुन दाखवला.त्यामुळे पीक विमा कंपनी गोत्यात येण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांनी  या विषयी विशेष लक्ष दिल्यामुळे केळी पीक विमा बाबत ताबडतोब एक उच्चस्तरीय समीती स्थापण करुन जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाचा सखोल अहवाल मागवला आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबतीत कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले व केळी पीक विमा बाबत तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना ही यावेळी कृषी विभागाला देण्यात आली.

बारड येथुन शेतकरी प्रतिनीधी म्हणुन उत्तमराव लोमटे ,प्रतापराव देशमुख तर अर्धापुर विभागातुन श्री गंगाधरराव देशमुख पार्डीकर,नंदकिशोर देशमुख पार्डीकर या  सर्वांनी ठासुन पणे   शेतक-यांची बाजु भक्कम मांडली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री हनुमंत राजगोरे व ता. अध्यक्ष बालाजी कल्याणकर आदींनी या ठिकाणी शेतकऱ्यांची  बाजु मांडली.लवकरच या प्रकरणाचा निकाल बारड व अर्धापुरच्या शेतकऱ्यांच्या बाजुने लागेल असे मत शेतकरी प्रतिनिधी उत्तमराव लोमटे बारडकर यांनी व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या