मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रमुख अंगरक्षक जीवाजी महाला यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुदखेड येथील जीवा महाले चौकात जीवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संजय पा कुरे खुजडेकर शिवसेना तालुका प्रमुख मुदखेड,सचिन पा माने शिवसेना शहर प्रमुख मुदखेड, सुरेश शेटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड, गंगाधर कुचटवाड जीवा सेना नाभिक तालुका अध्यक्ष मुदखेड, ज्ञानेश्वर गायकवाड शहर उपाध्यक्ष जिवा सेना मुदखेड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान व छत्रपती शिवाजी महाराज भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी राजांनी अफजलखानास मारल्यावर अफजलखानाचा सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला परंतु जिवाजी महालाने सय्यद बंडा शि दोन हात करून आपला दांडपट्टा काढून त्याला पालथा पडले व छ.शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले यावेळी जिवाजी महाला चे वय अवघे 25 वर्षाच्या आत असावे.
रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कानोजी जिथे यांच्या जहागीर अंबवडे गावी वीर कानोजी येथे यांच्या समाधीस्थळाचे च्या बाजूला वीर मावळा तथा छत्रपती अंगरक्षक जिवाजी महाला यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी राजे यांचे यावेळी प्राण वाचवल्यामुळे "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या प्रसंगावरून पडली.
छत्रपतींच्या या वीर मावळ्यास व योद्धास जन्म तिथि निमित्ताने विनम्र अभिवादन संजय पाटील कुरे शिवसेना तालुकाप्रमुख मुदखेड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा