नेते प्रवीण गायकवाड यांची भाजपा मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा

 संपादक आशिष मुगटकर




मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

   मुदखेड येथील भाजपा भोकर विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. 

अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाने नुकत्याच प्रदेश कार्यकारिणीच्या विविध अघाड्यांवर पदाधिकार्यांच्या नियुकत्या जाहिर  केल्या आहेत.

  नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र भाजपाचे कडवे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांची "मराठवाडा प्रभारी पदी"वर्णी लागली आहे.गायकवाड यांनी या अगोदर पक्षाच्या विविध महत्वाच्या पदावर काम करुन आपल्या शारिरीक क्षमतेवर मात करुत त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्य कार्यकारी समितीवर साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळालेले गायकवाड हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते आहेत.

      प्रवीण गायकवाड यांची मराठवाडा प्रभारी पदी वर्णी लागल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपाचे पदाधिकारी, आप्तईष्ट, मित्रपरिवार यांच्या कडून सत्कार होत आहे.

  त्यांच्या राहत्या घरी मुगटचे माजी उपसरपंच तथा भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंदराव कल्याणे  व भोकर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे युवा नेते तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार साहेबांचे कट्टर समर्थक गणपतराव पा.कल्याणे यांनी मुदखेड येथे मा.प्रविण गायकवाड साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.या कार्यक्रमास मुदखेड शहराध्यक्ष पप्पु उर्फ संजय सोनटक्के,.केशव ढगे संरपच वाई.बाबुराव कसबे उप सरपंच वाईकर .प्रभाकर पांचाळ.संंजय राठोड.विलास कल्याणे,जी.एस.पांचाळ आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या