राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणार्या साईट नाली कामावर सिमेंट वापर अल्प प्रमाणात होत असल्याने कामाचा दर्जा घसरला!
बारड /प्रतिनिधी
बारड ते भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे काम संथ गतीने सुरू असून गेल्या अनेक दीवसापासुन हे काम सुरू आहे परंतु संतगतीने सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गा वरील कामाचा दर्जा घसरल्याने काम दर्जाहीन होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर बारड परिसरामध्ये दोन किलोमीटर साईट नालीचे काम सुरू करण्यात असून कामांमध्ये अत्यल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात येत असल्याने तसेच कामाला क्युरिंग करण्यात येत नसल्याने होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची शहानिशा करून सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते दिगंबर टिप्परसे यांनी यावेळी केली आहे.
बारड येथील महामार्ग साईट नाली कामांमध्ये खोदकाम केल्यानंतर बेसिक पाया हा अति अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करून तसेच त्याची साईज जाडी कमी प्रमाणात बेड करण्यात येत असल्याने बेसिक निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे. तसेच नाली कामावर क्युरिंग पाण्याचा वापर पण करण्यात येत नाही कामाला क्युरिंग नसल्याने होणाऱ्या दर्जाहीन कामाला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे? सिमेंटचे प्रमाण अति अल्प प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने कामाची क्वालिटी मजबुतीकरण होत नसल्याने अति कमी मटेरियल वापरून कामात लोवेस्ट पणा करण्यात येत आहे या कामाची कॉलिटी कंट्रोल करून तपासणी करण्यात यावी तसेच दर्जाहीन होणाऱ्या कामाला चाप बसवावा असे नागरिकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर डांबरीकरणाचा रस्ता मजबुतीकरण करण्याचे कामही सुरू आहेत परंतु अति अल्प प्रमाणात डांबराचा वापर करण्यात येत असल्याने हे काम पण दर्जायुक्त होत नसल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने कामचुकार पणा करण्यामध्ये कंपनीने जास्त इंटरेस्ट घेतला असल्याचे समोर येत आहे सुरुवातीस जीडीएस कंपनीने या राष्ट्रीय महामार्गाची कामे केली ती पण दर्जा युक्त केली नसल्याने त्या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे तर हे काम काढून घेण्यात आले आहे. त्यानंतर शासनस्तरावरून निखिल कंट्रक्शन कडे राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यासाठी देण्यात आलेले आहे परंतु संबंधित कंपनी काम थातूरमातूर पणे उरकून जाण्याच्या मार्गावर असल्याचे समोर येत आहे शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा निधी या रस्त्यासाठी खर्च करण्यात येत असला तरी रस्ता हा तरतुदीनुसार होत नसल्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम फक्त म्हणण्या पुरतेच उरले असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे बारड ते भोकर राष्ट्रीय महामार्गावर चालू असलेल्या कामाची तसेच दर्जाहीन होत असलेल्या कामाची बारकाईने सखोलपणे गुण मापक यंत्रांच्या साह्याने चौकशी करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्ते दिगंबर टिप्परसे यांनी यावेळी केली आहे.
संबंधित कंट्रक्शन च्या जबाबदार व्यक्तींना या कामाबाबत विचारणा केली असता हे काम आम्ही लॉस मध्ये करत असल्याचे सांगण्यात येत असून उडवाउडवीची उत्तरे त्या ठिकाणाहून मिळत असल्याने काम हे इस्टिमेट नुसार होत नसल्याचे समोर येत आहे.या कामाची उच्चस्तरीय समिती अंतर्गत तपासणी करून दर्जाहीन होणाऱ्या कामाला लगाम लावण्याची गरज आहे.
खैरगाव बारड शेंबोली पांढरवाडी खरबी राष्ट्रीय महामार्गावरील कामावर खोदकाम न करताच खडकाचा आधार घेत सूरी चा वापर करून आईल युक्त डांबर टाकून काम बोगस पण एक करण्याचा घाट संबंधित कंपनी रचला असल्याने कामाचा दर्जा खालावला असल्याचे समोर येत आहे खोदकाम नकरताच काम होत असल्याने महामार्ग मजबुती करणाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
परंतु समधीत विभागाचे अधिकारी काम कसेही असो बोगस कामाची बिले कन्ट्रक्शन ला त्वरित काढून देण्यासाठी मुंबई येथे ठाण मांडून बसले असल्याने बोगस कामाची चौकशी त्वरित करण्याची गरज आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा