प्रा. पंजाबराव शिंदे यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान

 संपादक आशिष मुगटकर




बारड /प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयीन  प्रा. पंजाबराव शिंदे यांनी मराठी विषयात 'शंकर वाडेवाले व केशव सखाराम देशमुख यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास' हा शोध प्रबंध स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सदर केला होता. त्याची मौखिक अंतिम परीक्षा दि २२/०९/२०२० रोजी घेण्यात आली व त्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी ) ही पदवी प्रदान करण्यात आली .



यांबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड चे अध्यक्ष मा संजयराव देशमुख बारडकर,उपाध्यक्ष मा रमेशचंद्र महाजन,सचिन रामेश्वर कोरबनवाड,सहसचिव अशोक पाटील गव्हाणे,प्राचार्य हेमंत इंगळे, मुख्याध्यापक रामकीशन चुब्बेवार,केम्ब्रिज इंग्लिश स्कुलचे प्राचार्य सचिन पाटील गव्हाणे व संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ पंजाबराव शिंदे यांचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या