टिप्पर पलटी होऊन; दहा मजूर जखमी.
![]() |
| टिपर पलटी :- महाटी शिवारात मुख्य रस्त्यावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पलटी होऊन दहा मजूर जखमी |
मुदखेड तालुका/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील महाठी शिवारात्र अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पलटी होऊन दहा जण जखमी. एका मुजरा चे दोन पाय निकामी झाली आहेत.
मुदखेड तालुक्यातील येळी, महाठी, माळकौठा या परिसरात अवैधपणे रेतीची वाहतूक ही चालूच असून या मुख्य रस्त्यावर रेती माफिया कडून अवैध रेतीचे साठे जमा केले आहेत. तीच साठा केलेल्या रेतीचे टिपर एम एच१४ ए एस९२१७ गाडी नंबर सकाळी ७ च्या सुमारास माळकौठा येथे भरून महाठी मार्गे नांदेड कडे निघालेले असतात महाठी येथील एका वळणावर हे टिपर पलटी होऊन त्यात बसलेले १० मजुरांचे प्राण थोडक्यात वाचले.
या घटनेत त्यातील एका मजुराला मात्र आपले दोन्ही पाय गमवावे लागले, इतर नऊ मजुरांच्या डोक्याला, हाताला, पायाला चांगलाच मार लागला आहे.जखमी झालेल्या मजुर हे येळी, दरेगाव येथील आहेत.त्यांची नावे पुढील प्रमाणे
अंबादास व्यंकटी कांबळे वय १६ मार दोन्ही पाय निकामी झाले. केशव गाढे दरेगाव वय ३० मार टाचला मार, तिरुपती नामदेव ढगे वय ३५ डोक्याला मार , व्यंकटी पवार ड्रायवर वय २४ मार कानाला खुब्याला ,नारायण लांडगे वय ३४ मार हाताला, पायाला वामन ढगे वय ३४मार तोंडाला ,केशव कांबळे वय १६ मार हाताला,पायाला , डोळ्याला ,मोहन टोकलवाड वय ३६मार पाठीला ,कैलास पवार वय ३४ मार कंबर, सुरकतवार वय १९ मार पाठीला आहे. जखमी ना शासकीय रुग्णालयात नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा