नांदेड़ जिल्हा छावा प्रवक्तापदी प्रा. प्रभाकर जाधव, जिल्हा संघटक डॉ. कमलाकर कणसे यांची निवड.
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
नांदेड़ आज विजयादशमीच्या निमित्ताने छावा मराठा संघटना महाराष्ट्र, शाखा नांदेड़ यांची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात सदैव कार्यरत असलेली छावा मराठा संघटना ही मागील २५ वर्षापासून विधायक मार्गावर विश्वास ठेवून लढा देणारे संघटना आहे.आजच्या नव्या पिढीला छावाची रचनात्मक कार्यपद्धती कशी आहे.ती ओळख व्हावी. म्हणून छावाचे अनुभवी कार्यकर्ते व नवीन कार्येकर्ते यांच्यात विचारांची देवाण घेवाण व्हावी व नवीन कार्यकारिणी सदस्याची निवड करण्याच्या औचित्यने छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि.तानाजी हुस्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विचार मंथन बैठक संपन्न झाली.
या बैठकीला दिल्ली सुप्रीम कोर्टातील नांदेडचे प्रसिद्ध विधीतज्ञ तथा छावाचे माजी कार्यकारी सदस्य एडवोकेट अमोल सूर्यवंशी तसेच लोहा येथील उद्योजक कथा औषध निर्माता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय शिरसागर, दीपक पावडे, दीपक पाटील राजूरकर, उमाकांत उमरेकर, खुशाल जाधव, स्वप्नील इंगळे या अनुभवी छावात काम करणाऱ्या कार्यकारी मंडळ सदस्यांच्या उपस्थित सद्यकालीन समाजापुढे असलेल्या नवनवीन समस्यांच्या संदर्भात विचार मंथन करून या समस्यांना सामोरे जाण्याचे छावा संघटनेचे संघटन अधिक मजबूत झाले पाहिजे. त्यासाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये जिल्हा प्रवक्ता या पदावर प्रा. डॉ. प्रभाकर जाधव जिल्हा संघटक प्रा. डॉ. कमलाकर कनसे आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इंजि.प्रवीण जाधव यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.
ह्या नवनिर्वाचित सदस्यांना लगेच प्रदेश कार्याध्यक्ष इंजिनियर तानाजी हुस्सेकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या नव्या कार्यकारिणीला उपस्थित सर्वांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा