विविध विकास कामांचा घेतला आढावा.
![]() |
| सुसंवाद :- मुदखेड तालुका दौऱ्यावर आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.वर्षा ठाकूर यांनी मुगट गावातील शालेय विद्यार्थीनी शी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले. |
मुगट/प्रतिनिधी
दि.२२ रोजी मा. वर्षा ठाकूर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नांदेड यांनी मुदखेड तालुक्याचा दौरा केला. त्यांनी ग्रामपंचायत मुगट,प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे भेट दिली. विविध कामांचा आढावा घेतला.
प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कासराळीकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणाताई कल्याणे, जिल्हा आरोग्य अधिकारी मुंडे, मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव, नांदेड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, विस्ताराधिकारी गायकवाड, कनिष्ठ अभियंता घोडके, व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
मुगट ग्रामपंचायत कडून ग्रामविकास अधिकारी भुरे यांनी त्यांचे स्वागत केले.मुगट ग्रामपंचायत ला भेट देऊन गावातून परत येताना वाटेत त्यांना एक दृश्य दिसले. दोन मुली घरासमोर अभ्यास करत आहेत. तेव्हा त्यांनी ड्रायव्हर ला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून उतरून मुली जवळ गेल्या. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या मुलींचा अभ्यासाचा ध्यास बघून मॅडम आनंदीत झाल्या.
आपल्या मुदखेड तालुक्याचे हे बोलके चित्र आहे. सगळीकडे अशाच प्रकारे आपल्या तालुक्यातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत पण शिक्षण चालू आहे. हा संदेश या मुगटच्या दोन मुलींनी दिला आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी या दोन मुलींची भेट घेऊन मुलींना मार्गदर्शन केले, त्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा