मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती बद्दल निषेध!.
बारड/ प्रतिनिधी
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती बद्दल त्याविरोधात सकल मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी निवेदनावर मराठ्यांना त्वरित आरक्षण द्यावे, मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने आणलेली स्थगिती त्यावर राज्य सरकार व केंद्र सरकार यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने समाजाची दीशाभूल करण्याचे कार्य चालू आहे याबाबत खेद व्यक्त केला आहे.
यावेळी समाज बांधवांकडून घोषणाबाजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. राज्यस्तरीय मराठा समिती व छत्रपती संभाजी राजे यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यानुसार राज्य शासन व केंद्र शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी बारड परिसरातील सकल मराठा समाज बांधवां कडून यावेळी करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेस कर सल्लागार उत्तमराव लोमटे, भाजप विधानसभा अध्यक्ष निलेशराव देशमुख, मनसे तालुका अध्यक्ष माधव पावडे यांनी मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले आहे. मराठा समाजाला आरक्षण त्वरित मिळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या कडे लेखी निवेदन देवून मागणी केली आहे.
यावेळी निलेशराव देशमुख, उत्तमराव लोमटे, माधव पावडे, किसन देशमुख, दीपक पाटील, विजय देशमुख, शरद कवळे, सूर्यभान व्यवहारे,सतिष व्यवहारे, संदीप पुयड, कृष्णकांत देशमुख माधव लोमटे,श्रीनिवास महादवाड, आनंदराव नादरे विरेंद्र देशमुख,बाळासाहेब गव्हाणे, हनुमान देशमुख अमोल लोमटे, कपील पवार,आदीसह मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक खोळंबली होती. रास्ता रोको आंदोलन संपल्यावर पोलिसांनी वाहतूक सुरळीत पणे चालू केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा