मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत पोलीस स्मृती दिवस साजरा

 संपादक आशिष मुगटकर

 पोलीस स्मृती दिवस :- मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत सर्व बलाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सर्वोच्च शहीदांची  आठवण करून  श्रद्धांजली वाहताना पोलीस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर,अधिकारी व जवान.


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

   नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्था येथे डॉ. टी शेखर पोलीस महानिरीक्षक यांनी मुदखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्था  प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला , यांच्या नेतृत्वात पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आला आहे.

यावेळी  पोलीस महानिरीक्षक सीटीसी मुदखेड डॉ. टी शेखर  यांचा आगमनानंतर पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस स्मृती दिवस यांची उपस्थित सर्व अधिकारी, जवानांना संबोधित करून या दिवसाच्या इतिहास बदल उपस्थितांना या दिवसाची ओळख करून देताना सांगितले की १९५९ आज रोजी सीआरपीएफ ची तिसरी बटालियन ची २१ जवानांची एक कंपनी  गस्त घालत असताना लदाख येथे 'हॉट स्प्रिंग' च्या माध्यमा तून चीनच्या जवानांची एक मोठ्या आक्रमण करण्याच्या उद्देशाने निष्क्रिय करण्यात भारताच्या जवंनाना यश प्राप्त झाले भारत मातृभूमीच्या रक्षणार्थ मोलाचं करत असताना आपल्या शूरवीर १० जवान शहीद झाले असल्याचे  संबोधन करताना सांगितले याकारणामुळे प्रत्येक वर्षी २१ ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

तर सर्व बलाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सर्वोच्च शहीदांची  आठवण करून अंतर्कणाने श्रद्धांजली वाहिली आमच्या बलाबद्दल ही एक अभिमानाची गोष्ट आहे आमचे निर्भिड आणि पराक्रमी जवानांच्या बलीदाना बदल राष्ट्रीय पातळीवर पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याबाबत माहिती दिली आहे, 

पुढे बोलताना बळ हे बहादुरांचा बळ असून ज्यांनी वेळो वेळी विरतेचा प्रदर्शन करून बळास इतिहास घडवून अधिक वर्तमान परिस्थिती मध्ये  समृद्ध केले असल्याचे मनोगत व्यक्त केले आमुचा बळ हे विशाल बळ असून वाहत्या नदी प्रमाणे समान पथक्रमन केले आहे समोर येणाऱ्या हजारच्या अडथळ्यांना मागे टाकून आपल्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी अविरत पुढे जात आहे , देशाची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सम्पूर्ण देशाचा विश्वास आमच्या सोबत आहे जे आम्हाला अधिक बळकटी देत असते जर आम्हास आमच्या प्राणाची आहुती देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा आम्ही करण्यास आम्ही मागे पुढे हटणार नाही देशाच्या विश्वासास तडे देणार नाही.असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे

 पोलीस महानिरीक्षक डॉ. टी शेखर यांनी मागील एक वर्षात देशातील विविध पोलीस बलातील बलिदान दिलेल्या शहीद कर्मचारी यांची यादी वाचून दाखवली आहे

शेवटी पोलीस महानिरीक्षक डॉ. टी शेखर यांनी शहीद कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करून यांच्या बलिदान बदल नमन करून देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपला सर्वोच्च पण पणाला लावण्यासाठी दृढ संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे अधिकारी,जवान उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या