मुगट येथे केळी पिकावरील शेतीशाळा संपन्न

 हॉर्टसॅप प्रकल्प अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन


मुगट प्रतिनिधी

 दि.२०रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथे केळी पिकावरील किड व रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प (Hortsap) 2020 अंतर्गत शेतकरी शेतीशाळेस सुरूवात करण्यात आली.

उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव व तालुका कृषी अधिकारी भागवत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला एक शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आजच्या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. कृषी अधिकारी सुनील पुरी यांनी शेती शाळेचे महत्त्व व उद्देश तसेच केळी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक तथा पेस्ट स्काऊट राम कपाटे यांनी केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरस (CMV)   चे एकात्मिक रोग व्यवस्थापन तसेच केळी पिकावरील बुरशीजन्य रोग याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

त्यानंतर शिवार फेरी घेऊन शेतकऱ्यांनी केळी पिकावर निरीक्षणे घेतली.

शेतीशाळा यशस्वीते साठी कृषी सहाय्यक राजकुमारी देशमुख यांनी मेहनत घेतली. या शेतीशाळेस मं.कृ.अ. वाघमारे साहेब, कृषी पर्यवेक्षक हिलालपुरे , बी. टी. एम. गीते तसेच रमेश कल्याणे, माधव कल्याणे, विश्वनाथ कल्याणे, नागोराव गिरे, दिगंबर कल्याणे, साईनाथ पांचाळ व गावातील शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या