नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांचे गतवर्षी दि. १६ आॕक्टोबर२०१९ रोजी निधन झाले होते.त्याच्या स्मृती प्रित्यर्थ दिवंगत गायकवाड यांचे चिरंजीव पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी शुक्रवारी बिलोली येथील तहसिलसमोर नागरिकांना मास्क आर्सेनिकअल्बम-30 या गोळ्यांचे वाटप नायब तहसिलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. नागेश लखमावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर, माजी नगराध्यक्ष भिमराव जेट्ठे, सेवानिवृत्त तलाठी माधवराव जाधव, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे,शेख सुलेमान ,राजेंद्र कांबळे, अभिजित तुडमे,दिलीप उत्तरवाड, गंगाधर पुपलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, नगरसेवक जावेद कुरेशी, अमजद चाउस, आरोग्य पर्यवेक्षक हणमंत कटके, सुधीर येलमे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा