मुदखेड शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्री, गुरांचा वावर बिनधास्तपणे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

 मुदखेड शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्री व मोकाट गुरांचा वावर बिनधास्तपणे सुरू असून नगरपरिषदेकडून या मोकाट फिरणाऱ्या गुरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी चावा घेऊन लहान मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात घडली होती अशी घटना मुदखेडात होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून यावर पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

        शहरातील सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण हे शिवाजी नगर, नांदेड रस्ता,मोंढा भाग,पचलींग हाॅस्पिटल समोरच्या भागात भाजी बाजार भरतो आहे व अशा गर्दीच्या ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांचा व कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे परिणामी दुर्घटना घडू शकते यावर पालिकेकडून उपाययोजना करणे आवश्यक आहे.विशेष म्हणजे मोकाट फिरणाऱ्या गुरांसाठी पूर्वी गजाघाट अस्तीत्वात होते कालांतराने आता उपलब्ध नाही तसेच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणाही उपलब्ध नाही.याच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांकडून गुजरी भागातील कत्तलखान्यातून मांसाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले दिसून येतात यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन माने यांनी निवेदनही दिले होते परंतू आतापर्यंत त्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही हे विशेष म्हणावे लागेल.


मुदखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे व काही नगरसेवकही कोरोनाबाधित झाले होते ते यांतून सुखरूप घरी परतले पण सर्व सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नागरिकांतून विचारल्या जात आहे.मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयातही मोकाट कुत्री फिरताना दिसून आली यावर जरी या कुत्र्यांकडून कुणाला चावा घेण्यात आला तर याला जवाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या