वासरी येथे महिला किसान दिना निमित्त भाजीपाला बियाण्याचे वाटप

 संपादक आशिष मुगटकर

महिला किसान दिन:- मुदखेड तालुक्यातील वासरी येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगुणाबाई खानसोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राम कपाटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शंकर मुतकलवाड उपस्थित होते.

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 दि. १६ रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गटातर्फे महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगुणाबाई खानसोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राम कपाटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शंकर मुतकलवाड उपस्थित होते.

माँसाहेब जिजाऊं च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचलन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांनी केले. त्यानंतर कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी परसबागेतील भाजीपाला लागवड तसेच कृषी विभागाच्या महिलांसाठी असलेल्या योजना व शेतमाल प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करून सेंद्रिय खत तसेच कीटकनाशकाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याविषयी सांगितले. त्यानंतर शीलाताई लष्करे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांच्याकडून भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रयागबाई उमाटे, सोमित्रा खानसोळे, रेखा उमाटे, गंगासागर उमाटे, उषा उमाटे, संगीता खानसोळे, आशाबाई खानसोळे, सुंदराबाई लष्करे, संगीता उमाटे, व्यंकणबाई लष्करे व गावातील महिला शेतकरी यावेळी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या