मुदखेड शहर प्रतिनिधी/अतीक अहेमद
मुदखेड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सौ. पूजा माधवराव व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुदखेड तालुकाध्यक्ष पदी सौ. पुजा माधवराव व्यवहारे यांची निवड केली.सदर निवडीचे नियुक्तिपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष यशोदीप पाटील, चक्रधर कळणे, माधवराव व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्षा सौ.पुजा माधवराव व्यवहारे यांनी या पदाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न व अडीअडचणी सोडवून पक्षवाढीसाठी काम करू असे सांगितले.
या निवडीमुळे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा