![]() |
मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
दि.१५रोजी मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयच्या वतीने महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सिमाताई लष्करे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती.सुनिता बोचरे व डॉ. मंजूषा माचर्डे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक आर. जी. धुमाळे यांनी केले. त्यानंतर मेंडका येथील प्रगतशील महिला शेतकरी कावेरी घोसले यांनी शेती व्यवसायातील महिला सहभागाचे महत्व सांगून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायावर भर देण्याविषयी सांगितले. तसेच डॉ.मंजुषा माचर्डे यांनी शेती करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. म.कृ.अ. वाघमारे साहेब यांनी महिलांसाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.कृषी सहाय्यक अनिता मोरे यांनी महिला शेतीशाळा विषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये सीमाताई लष्करे यांनी महिला बचत गटाचे महिला सक्षमीकरण्यातले महत्त्व सांगून महिलांनी शेती निर्णय प्रक्रियेत पुढे येण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील महिला शेतकरी , सुनंदा कदम, रामबाई कुसुमवाड प्रतिभा तिडके विठ्ठल लष्करे, नागोराव गिरे, इंद्रजीत देशमुख, विश्वनाथ कल्याणे , तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्रीम. राजकुमारी देशमुख यांनी केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा