भाजपाच्या मराठवाडा प्रभारी पदी प्रवीण गायकवाड यांची निवड

  संपादक आशिष मुगटकर



मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

   भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाने नुकत्याच प्रदेश कार्यकारिणीच्या विविध अघाड्यांवर पदाधिकार्यांच्या नियुकत्या जाहिर करण्यास सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक जयसिंग कृ.चव्हाण आणि प्रदेश प्रभारी प्रमोद जठार यांनी घोषित केलेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीचा जंबो विस्तार प्रसिद्धीस दिला आहे.

  यात प्रदेश सह, संयोजक,प्रभारी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अस्या विविध पदांचा प्रामुख्याने समावेश आहे.

     या जंबो कार्यकारिणीत नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र भाजपाचे कडवे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांची "मराठवाडा प्रभारी पदी"वर्णी लागली आहे.गायकवाड यांनी या अगोदर पक्षाच्या विविध महत्वाच्या पदावर काम करुन आपल्या शारिरीक क्षमतेवर मात करुत त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्य कार्यकारी समितीवर साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळालेले गायकवाड हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते आहेत.पुन्हा एकदा मराठवाड्यातिल नांदेडसह लातूर,बिड,उस्मानाबाद,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली या आठ जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम करण्याची संधी देऊन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाने प्रवीण गायकवाड यांना गौरवान्वित केले आहे.

    या आघाडीचा विस्तार पुढिल प्रमाणे सह सहयोजक:1विजय मांडल कर (रायगड)2.डॉ भगवान चव्हाण (औरंगाबाद),विशेष सल्लागार: राजेंद्र पुरोहित(मुंबई),जनसंपर्क प्रभारी:हेनत (काकासाहेब)दिक्षीत नाशिक,शासकीय योजना व प्रकल्प:-सौ.अर्चना जोशी (कल्याण)

वैद्यकीय विषयक प्रभारी :- डॉ.राजू राऊत,क्रिडा प्रभारी:धनंजय दा.ऊपासनी(नागपूर),सह क्रिडा प्रभारी:योगेश मोकाशी (ठाने),कार्यालय प्रमुख:हार्शल साने (मुंबई),मराठवाडा विभाग प्रभारी :-. प्रवीण गायकवाड   (नांदेड ग्रा.)

कोकण विभाग प्रभारी :- साहजीकच कोळी (रत्नागिरी),मुंबई विभाग प्रभारी:विशाल पाटिल(मुंबई),पश्चिम महाराष्ट्र प्रभारी:संजय चौगुले (कोल्हापूर),उत्तर महाराष्ट्र प्रभारी :-सतिश चोरडीया(धुळे),पुर्व विधर्भ प्रभारी:अमोल वाळके(नागपूर ग्रा.) ठाणे विभाग प्रभारी :- मदन सकलेजा(ठाणे), पश्चिम विदर्भ प्रभारी :- लक्षमन भांबेरे(बुलढाणा)

सदस्य:1भास्कर हिवराळे(अमरावती ग्रा.),2गणेश पाटील(जळगाव),अनील कुलकर्णी (वाशिम),संजय वानखेडे (जळगाव),अशोकाला चौधरी(भंडारा ग्रा.),दिपक आनंत दळवी(सिंधुदूर्ग),सुहास कर्णिक (मुंबई),पराग आपटे(पुणे),मनोज पटवारी,श्रवण बाधित,(जालना),हिरालाल गुप्ता(नागपुर ग्रा.),मारुती मुंडे(उस्मानाबाद)

 या राज्याच्या जंबो विस्तारात प्रवीण गायकवाड यांची वर्णी लागल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश संयोजक जयशिंग कृ.चव्हाण यांनी देखील त्यांच्या  नियुक्ती पत्राद्वारे निवड झाल्याचे कळऊन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या