नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी
एस एस सी क्लासमेंट ग्रुप तर्फे २६/११ या दिनानिमित्त औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक,ग्रामपंचायत समोर पेठवडज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला ५१ रक्तदान करून आपले सहयोग दिले आहे. या शिबिरामध्ये नांदेड येथील श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांनी सहभाग नोंदवला होता. या शिबिराचे उद्घाटन डॉ गायकवाड सर यांच्या हस्ते झाले. यावेळी एस एस सी क्लासमेंट ग्रुप चे मेंबर उपस्थित होते.
आज कोविड-१९ च्या पादुर्भावामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताची खूप गरज असून रक्तदाते पुढे येत नाहीत तर अशा शिबीरांच्या माध्यमाने रक्तदान झाल्यास समाजाला खूप मोठी मदत होईल असे मत डॉ गायकवाड यांनी यावेळी मांडले. दर वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा माणस या ग्रुप चा आहे तर या वेळेस आरोग्याला मोठी साथ मिळावी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करून युवकांना समाजासाठी काहीतरी देणे लागतो या करिता प्रेरित करण्याचे काम नेहमी एस एस सी क्लासमेट करेल अशा विश्वास ग्रुप ने बोलून दाखवला.
यावेळी शहीद पोलिस यांना अभिवादन करण्यात आले. समाजासाठी हितकरी काम करण्याचे उद्देश असल्याचं बोलून दाखवून दिलं.
या शिबिराला यशस्वी करण्याकरिता शिव चिटकुलवार,अमोल पांढरे,प्रदीप पुटवाड,प्रताप कंधारे,ज्ञानेश्वर सुवर्णकार,वैभव केंद्रे,तुळशीदास डावकोरे,आकाश पूटवाड,संदीप जोगदंड,अरुण पंदीलवाड,गणेश गड्डमवार आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा