मुगट येथे हॅपीनेस प्रोग्राम शिबीर संपन्न

   शिबीरातील युवकां कडून स्वयंस्फूर्तीने केली ग्राम सफाई.


मुगट/ प्रतिनिधी

 मुगट येथील मुगट पाटी जवळील आश्रम शाळेमध्ये परम पूज्य. श्री.श्री.रविशंकरजी महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग या जागतिक संस्थेद्वारे मुदखेड तालुक्यातील मुगट येथे सहा दिवशीय हॅपीनेस प्रोग्राम (आनंदाची अनुभूती) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवशीय शिबिरात सहभागी झालेल्या अनेक साधकांना या शिबिराचे आयोजक तथा आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक श्री राजेश्वर भुरे यांनी या सहा दिवशीय शिबिरामध्ये योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया व जीवन सुखमय जगण्यासाठी  प्रशिक्षित केले. सुखी जीवनाची गुरुकिल्ली या सहा दिवशीय शिबिरामध्ये उपस्थित साधकांना त्यांनी दिली.


 या सहा दिवशी शिबिरामध्ये गावातील अनेक नवतरुण, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिरांमधून प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीने सर्व साधकांच्या कडून मुगट ग्रामतील मुख्य रस्त्याची सफाई करण्यात आली.


 मुगट येथे हॅपीनेस प्रोग्राम चे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वयंसेवक म्हणून माधवराव कल्याणे, विश्वनाथ कल्याणे, अनिल कुलकर्णी, वामन हाटकर सह आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या