पोलिस निरीक्षक बदलीनंतर दिला ग्रामस्थांनी निरोप !
बारड/ प्रतिनिधी
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच बारड नगरीमध्ये सन्मान करण्यात आला असून अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निरोप देऊन सन्मान केला आहे.
यावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पदोन्नत पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस कर्मचारी दिनेश लोलगे,गजानन डूकरे,यांची बारड पोलीस ठाण्यातुन बद्दली झाली आहे परंतु त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मग तो कोरोना संकटकाळ असो ईतर कर्तव्यही जबाबदारीने पार पाडले असल्याने हे त्यांच्या कार्य शैलीतून अधिकारी लवकरच जनप्रिय झाले होते त्यांचा गौरव यावेळी पोलीस ठाणे बारड येथे नागरिकांकडून करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्यामराव टेकाळे, संचालक व्यंकटराव कल्याणकर, काँग्रेस करसल्लागार उत्तमराव लोमटे,माजी उपसरपंच प्रताप देशमुख, गोपाळ देशमुख,भाजप विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, दींगाबर टीप्परसे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, पत्रकार नामदेव बिचेवार,संदीप पवार, पत्रकार पिराजी गाडेकर,सुभाष धबधबे, पो.पा.यशवंतराव लोमटे आदी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी कोरोना योद्धा म्हणून नरबाची संभाजी पवार सेवाभावी संस्थेकडून या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले आहे. बारड युवा मित्र मंडळाकडून यांचा सन्मान करण्यात आला आहे, नवमीलाद मुस्लिम युवा मित्र मंडळ यांच्याकडून कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा गौरव करण्यात आला आहे.पोलीस पाटील संघटनेकडून निरोप देण्यात आला आहे
यावेळी सरेगाव सरपंच जीवनराव कळणे, दीगांबर यरमाड, व्ही.के.वाघमारे,सरपंच मल्लारि बल्लोड, सरपंच शंकर मुंगल,निवघा सरपंच मारोतराव पवार,पोलीस कर्मचारी अजर ईनामदार,रियाज, पवार,किडे,कदम,कारजंकर,वानोळे,भुरे,मोरे,आदीसह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ उपस्थितीत होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार तर आभार पोलीस जमादार रियाज यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा