मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील चिकाळा हे गाव पिकं कर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताराशिंग मार्केट नांदेड या बँकेकडे या पूर्वी दत्तक होती.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजना व उद्धव ठाकरे यांची महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहिर झाल्या पासुन सदर गाव मुदखेड तालुक्यातिल महसुली क्षेत्रात येणाऱ्या बँकेस जोडण्याची प्रक्रिया लिड बँक व्यवस्थापकानी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत पुर्ण केली आसून,लिड बँक व्यवस्थापक यांनी दिलेली जबाबदारी स्विकारण्यास बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड यांनी असमर्थता दर्शविली आहे.यामुळे लिड बँक व्यवस्थापकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड यांच्याकडे चिकाळा दत्तक दिल्याचे ऐकिव आहे पण अद्याप पर्यंत महाराष्ट्र बँक व्यवस्थापकाणा लेखी पत्र प्राप्त झाले नाही.परिणामी चिकाळा येथिल शेतकरी आसमानी संकटा बरोबरच प्रशासन आणि बँकेच्या सुलतानी संकटात सापडला आहे.या संकटातून मौजे चिकाळा येथिल शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चिकाळा या गावासाठी दत्तक बँक निश्चीत करण्याची मागणी भाजपा मराठवाडा प्रभारी(दि.वि.आ.) प्रवीण गायकवाड ,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव देशमुख इंगोले,भाजपा शक्ती प्रमुख दिगांबर देशमुख,सोपानराव देशमुख,बालाजी देशमुख,रावसाहेब देशमुख,बळी बळवंते,भगवान रामराव देशमुख,संजय नागोराव इंगोले,अशोक इंगोले,आंनदा झुंबाड अदिनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा