मुदखेड शहरात दोन सख्ख्या भावाच्या घरी एकाच वेळी चोरी...

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

मुदखेड शहरात शिवाजीनगर भागात घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दोन सख्ख्या भावाचे घरी दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमालासह रक्कम चोरी केल्याची घटना दिनांक २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली आहे.

शहरात शिवाजीनगर जुनी आयटीया कार्यालया पुढे असलेल्या संभाजी दत्तात्रेय पिन्नलवार व शाहजी दत्तात्रेय पिन्नलवार हे दोघेही भाऊ आपल्या कुटुंबासह सासरवाडीला गेले होते घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दिनांक २४ नोव्हेंबर च्या मध्यरात्री दोन दरवाज्याचे कुलूप तोडून घरामध्ये असलेल्या कपाट फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिने सह नगदी रक्कम चोरी केली असल्याची घटना घडली आहे.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश भाले, पांचाळ, यांच्यासह आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी पिन्नलवार यांच्या घरी चोरी झाल्याचे चौकशी करून अज्ञात चोरट्याच्या विरोधात मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

मुदखेड शहरात घराला कुलूप असल्याचे पाहून चोरी करण्याचे घटना सातत्याने घडत असून यापूर्वीसुद्धा माजी नगरसेवक कै. श्याम पांचाळ, प्राध्यापक आनंदा बौनवाड, यांच्यासह आधी नागरिकांच्या घरी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुदखेड शहरात सराफा दुकानदाराला लुटण्याचा प्रकार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांनी आठ दिवसाच्या आत जेल बंद केले असून त्याच प्रमाणे मुदखेड शहरात भुरट्या चोरट्यांच्या शोध घेऊन त्यांना लवकरच जेल बंद करू असे मुदखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या