प्रशासन आपल्या गावी उपक्रम बारडमध्ये उत्साहात

संपादक आशिष मुगटकर

भेट:-प्रशासन आपल्या गावी या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विभागाला भेट देऊन चर्चा करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे


बारड/प्रतिनिधी

     मुदखेड तालुक्यातील बारड येथे प्रशासन आपल्या गावी या उपक्रमातून नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विविध विभागात फेऱ्या माराव्या लागतात. काही कार्यालय तालुका व जिल्हा मुख्यालयी असतात. नागरिकांची कामे मंडळस्तरावरच मार्गी लावण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

दर शुक्रवारी विविध विभागाचे अधिकारी मंडळस्तरावर पोहोचून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जाणून घेतील. मुदखेड तालुक्यातील बारड येथे सदरचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वागत :- मुदखेड चे तहसीलदार दिनेश झांपले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना  ग्रामविकास अधिकारी बारड अनुप श्रीवास्तव.
 

ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, भूमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, महिला व बालविकास, पशुधन विकास, वीज वितरण कंपनी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी आपल्या विभागाच्या योजनांसह उपस्थित होते. यावेळी विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बारड मंडळातील नागरिकांकडून वेगवेगळ्या समस्यांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आला. 


     यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झांपले, सभापती बालाजी सूर्यतळे, गटविकास अधिकारी मारोतराव जाधव, सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, उपसभापती आनंदराव गादिलवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके, नायब तहसीलदार संजय नागमवाड, संजय भोसीकर, ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वानोळे, ग्रामपंचायत सदस्य माणिक लोमटे, विलासराव देशमुख, गजानन कत्रे, इंदूबाई भिमेवार, शेख आस्माबेगम, सोनी सूर्यलाड, प्रदीप देशमुख, संगीता सिरगीरे, राहूल आठवले, मीनाक्षी टिप्परसे, रोहिणी कवळे, मंगल बुरडे, कांता राठोड, सपना पूलकुंटवार, महानंदा देशमुख, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे शिवकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या