संपादक आशिष मुगटकर
जनसेवा ग्रामविकास पॅनलचे खुजड्यात वर्चस्व
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील खुजडा ग्रामपंचायती च्या सरपंचपदी सविता पवार उपसरपंच पदी वंदना संजय कुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.मुदखेड शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पाटील कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनल चे खुजडा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सात पैकी चार जागेवर विजय मिळवून ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली.
यावेळी सरपंच, उपसरपंच निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश लाठकर,यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गलांडे, ग्रामसेवक शंकर चिलेमोड, पोलीस भुक्तरे ,शेख यांंनी नियमावली नुसार सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया पार पाडली सर्वानुमते सरपंच, उपसरपंच, पदाची निवडणूक बिन विरोधक झाली आहे. सरपंच सविता भीमराव पवार उपसरपंच वंदना संजय पाटील कुरे ,सदस्य विमलबाई रमेश कुरे, मारुती बालाजी चिलमवाड,नुतन सदस्याचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी मुदखेड शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पाटील कुरे,बाबाराव कुरे,केशव कुरे,तेजराव कुरे,मारोती मालीपाटील,केशव पुयड,दींगाबर पवार, माधव पवार,राजदूत कुरे आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा