मुगट / प्रतिनिधी
मुदखेट तालुक्यातील मुगट येथे श्रेणी २चा पशुवैद्यकीय दवाखाना असुन या दवाखान्याच्या क्षेत्रात सभोवतालील ५/६गावाचा समावेश आहे.दररोज अनेक गावांतील पशुपालक ह्या ठिकाणी येतात.
या दवाखान्याच्या सभोवती मागील काही दिवसांपासून सांडपाणी साचलेले पाहायला मिळत आहे. या सांडपाण्या टाकलेल्या दगडावर पाय ठेवून या दवाखान्यात जावे लागते.गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सांडपाण्याच्या वाद मिटला नाही.
या पुर्वीच्या ग्रामपंचायत ला हा प्रश्न सोडविता आला नाही.त्यामुळे हे साचलेले सांडपाणी आता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सभोवती जमा झाले आहे.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी हा प्रश्न गावातील आहे म्हणून याकडे लक्ष दिले नाही. दिवसेनदिवस हे साचलेले सांडपाणी वाढत आहे . त्यामुळे पशुपालक यांना दगडाचा आधार घेत या दवाखान्यात यावे लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा