उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तलाठी सजा कार्यालयाचे मुगटला उद् घाटन.

 संपादक आशिष मुगटकर

    उद् घाटन :- मुगट येथे तलाठी कार्यालयाचे उद् घाटन करताना उपविभागीय अधिकारी खंदारे , सोबत तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार नागमवाड, मंडळ अधिकारी कुराडे, तलाठी श्रीमती देशपांडे 





 मुगट/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते तलाठी सजा कार्यालयाचे उद् घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार संजय नागमवाड, भोसीकर, जोगदंड मंडळ अधिकारी कुराडे,लाटकर, पठाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळ अधिकारी कुराडे यांनी उद् घाटक उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे  व  तहसीलदार झांपले  यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 यावेळी  तलाठी अपर्णा देशपांडे, यांचा उपविभागीय अधिकारी खंदारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.शासनाच्या 'सुंदर माझ कार्यालय' या अभियानाच्या माध्यमातून मुगट येथे हे तलाठी सजा कार्यालय सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे झाले असून त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे .
 या कार्यक्रमाला तलाठी कल्पना मुंडकर, खेडकर, केंद्रे, हंडे, असोले, बारसीकर, हैबते, मगरे, गलांडे, अव्वल कारकून खानसोळे, गाजीलवाड, गवार गुरू, दराडे, पुरमवाड ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील मुगट चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या