'प्रशासन आपल्या गावी' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद


कार्ड वाटप :- प्रशासन आपल्या गावी या उपक्रमात रोजगार हमी वाटप करताना तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे, गट विकास अधिकारी जाधव, भिमराव कल्यानेे, पिंटू पाटील वासरीकर व जॉब कार्ड स्वीकारताना   सौ. सुशीला सखाराम पवार.

मुगट /प्रतिनिधी

दि.५ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथे 'प्रशासन आपल्या गावी' हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र कंधारे, तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे, संचालक भिमराव पा. कल्याणे,पिंटु पाटील वासरीकर, गटविकास अधिकारी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार, पोलिस निरीक्षक शर्मा, नायब तहसिलदार नागमवाड महावितरण चे बाहेती यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकारी साहेब यांनी शासना कडून हा उपक्रम राबविण्या मागचा हेतू, उपक्रमाची माहिती उपस्थित लोकांना सांगितली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी, संचालक यांनी आपली मते मांडली.लोकांनी या अभियानात सहभागी होवून आपले प्रश्न, अडचणी मांडुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.असे ते म्हणाले.



उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोजगार हमी चे जाॅब कार्ड, सातबारा, राशन कार्ड, धनादेश, विविध प्रकारचे प्रमाणपत्रे यांचे वाटप करण्यात आले. लोकांनी या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व आपल्या अडचणी सोडुन घेतल्या.विशेष करून महावितरण,राशन, आधार व आरोग्य या विभागा कडे लोकांची गर्दी जास्त दिसून आली.  महसुल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग,राशन विभाग, आधार विभाग, बँकेची अधिकारी इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नायब तहसीलदार भोसीकर, जोगदंड, मंडळ अधिकारी कुराडे,लाठकर, पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, तलाठी देशपांडे,मुंडकर, खेडकर,केंद्रे,हंडे,असोले,बारसीकर,हैबते,मगरे, गलांडे, अव्वल कारकून खानसोळे,गाजीलवाड,गवार गुरू, दराडे,पुरमवाड, कृषी सहायक राम कपाटे, देशपांडे,जमादार शिंदे, महिला, विविध गावातील मंडळी, इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या