लोहार समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय व पालक सूचक मेळाव्याचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर


बारड/प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथे लोहार समाज विकास संस्था नांदेड च्या वतीने लोहार समाज वधू-वर परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ रोजी सकाळी ११ वाजता. शीतला मंगल कार्यालय बारड तालुका मुदखेड या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. प्रा. साहेबराव पोपळघट सर कार्यक्रमाचे उद् घाटक मा. श्री सदाशिवराव हिवलेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री गिरीश पोपळघट, मा. श्री दिनेश सोनाळेकर, कॅप्टन मा. श्री विजय कुमार सूर्यवंशी, मा. श्री डॉ. ओम प्रकाश पोपळे, मा. श्री अरविंद थोरात, मा. श्री दत्तकुमार कळसाईत, मा. श्री पी एल भालेराव, मा. श्री. डॉ. सत्यनारायण कोठे, मा. श्री युवराज टाकसाळ, मा. श्री सुभेदार काशिनाथ सूर्यवंशी, मा. श्री मेजर नंदकुमार कळसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मा.श्री. इंजि. दिलीप बाळसकर मा. श्री विजय रूम साहेब, मा. श्री प्रा. आर.एस. चाफे, मा. श्री मनोहर पिपळाइत, मा. श्री गणेश रावजी शिंदे, मा. श्री माधवराव सूर्यवंशी हे लागणार आहेत

तरी या कार्यक्रमासाठी लोहार समाजातील युवक युवतींना आपल्या मनपसंत जोडीदार निवडण्याची सुवर्णसंधी या उपक्रमात उपक्रमाद्वारे मिळणार आहे तरी समाजातील युवक-युवतींनी व पालकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नियोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे यावेळी नियोजन समितीमध्ये प्रकाश कौसे (अध्यक्ष), अशोक पोफळे (उपाध्यक्ष), दिलीप पोफळे( सचिव), शंकर पाचमाशे (सहसचिव),साईनाथ पांचाळ मुगटकर (कोषाध्यक्ष), त्रिंबक पोफळे (सहकोषाध्यक्ष), रामदास कळसे (संघटक), राजेश कौसे (सहसंघटक) यांचा समावेश करण्यात आलेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या