राज्यातील शिक्षकांचे २९ जानेवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलन सुरू,

 आंदोलनास पाच दिवस झाले तरी शासन घेत नाही दखल

नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्यातील गेली वीस वर्षांपासून होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विना अनुदानित शिक्षकांची हेळसांड थांबवा दि १३ सप्टेंबर२०१९ नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजचा २०%व टप्पा वाढ शाळांचा ४०%चा निधी वितरणाचा आदेश मा मंत्री महोदयांनी सभागृहात वारंवार अश्वासित केल्यानुसार  आताच तात्काळ पगार वितरणाचा आदेश काढून पगार सुरू करावा

 मागील वर्षी दि २४फेब्रुवारी२०रोजी ला आर्थिक अधिवेशनात मा अर्थमंत्री महोदयांनी पुरवणी मंजूर केली, तद्नंतर कोविडमुळे निधी वितरण केले नाही.बाकी कुणाचेच महाराष्ट्रात वेतन रोखले नाही पण आमचे मंजूर वेतन रोखून ठेवले.त्रुटी समिती नेमली, त्यानंतर १४/१०/२०च्या कॅबिनेटने १नोव्हेंबर२०२० पासून अनुदान देऊ केले त्यानुसार तपासून घोषित केलेले शाळा,कॉलेज पुन्हा तपासणी लावून आपण बरोबर एक वर्ष बीनपगारी शिक्षकांना झुलवत ठेवल,आधीच सर्व शाळा कॉलेज ह्या तपासून घोषित झालेल्या आहेत, व त्याचंअनुदान सभागृहात मंजूर आहे,तथा २०%वेतन  घेत असलेल्या शाळा पण चालू आहेत व त्यांचं पण ४०%अनुदान मंजूर आहे तसा जीआर मध्ये निधीचे टोकण अर्थ विभागाकडून टाकलेलं असतांना...


कुठल्याही शाळा कॉलेजवर अन्याय होऊ न देता तात्काळ निधी वितरणाचा आदेश काढण्यासाठी तथा अघोषित शाळा कॉलेज निधीसह घोषित करण्यासाठी 

 वरील मागण्यांसंदर्भात शासनाकडून गेली एक वर्षापासून आश्वासन व दिरंगाई शिवाय काहीच मिळत नसल्याने, विना अनुदानित शिक्षक हवालदिल झाला असून लोकडाऊन मध्ये २७ शिक्षक हृदयविकाराने व आत्महत्या करून मरण पावले आहेत तरी या निर्दयी शासनाने न्याय दिला नाही नुसतं अर्थखात शिक्षण खात्याकडे व शिक्षक खात अर्थखात्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचे काम करत आहे यासाठी नाईलाजास्तव कंटाळून पूर्ण महाराष्ट्रातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक दि २९ जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण सुरू केले असून पाच दिवस झाले जवळपास पाच। हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत तरी शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला असून यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित, अघोषित व अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे  झोपीचं सोंग घेणाऱ्या सरकारला जबाब मागन्यासाठी शाळा बंद करून आंदोलनात सहभागी झाले आहेत.  नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे लातुर विभागीय कार्याध्यक्ष प्रा कैलास खानसोळे ,प्रा बाळासाहेब डाखोरे,प्रा नखाते प्रा पालीमकर, प्रा शेरे ,प्रा पांडुरंग बोराडे सह असंख्य शिक्षक आझाद मैदानावर शासनाविरुद्ध लढा देत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या