माझं गाव सुंदर गाव कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

आढावा बैठक :- मुगट येथे 'माझं गाव सुंदर गाव' या अभियानाची आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना ग्रामविकास अधिकारी राजेश्वर   भुरे

मुगट/प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील मुगट येथे 'माझं गाव सुंदर गाव' या अभियानात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.त्या निमित्ताने मुगट येथे या कार्यक्रमात आढावा घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, शिक्षणासाठी प्रा.प्रशांत दिग्रसकर, गटविकास अधिकारी मुदखेड मारोती जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भिमराव पाटील, यांची या वेळी प्रमुख उपस्थितीत होती.



ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगीतली.

यावेळी ग्रामपंचायत चे नुतन सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड,इतर शासकीय अधिकारी, गावातील मंडळी, या वेळी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या