ब्रह्मा कुमारी पुजा बहन यांचे प्रवचन
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील निवघा येथे अखंड शिवनाम सप्ताह सुरू आहे. दर वर्षी प्रमाणे लिंगायत समाज सेवा मंडळाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह साजरा केला जातो.
दि. २१ रोजी प्रजापिता ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्र मुदखेड च्या संचालीका पुजा बहेन यांनी आपल्या प्रवचनात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांचे कार्या ची माहिती सांगितली, परमात्माचे वर्तमान काळात चालू महत्वपूर्ण कार्य व ब्रह्माकुमारीज़ या संस्थेमधे दिले जाणारे ध्यानात व्यवहार उपयुक्त ध्यान असुन ते आत्मसात करावे. जीवन जगण्याची कला मिळाली तर सात्विक व्यवहाराची संबंधात मधुरता येईल . जीवन सुखमय करण्यात मदत होते असे ब्रम्हा कुमारी पुजा बहेन यांनी सांगितले.
संयोजक समितीचे नारायण नरडले यांनी आभार व्यक्त करून सत्कार केला.
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर सुद्धा शिवनाम सप्ताह निमित्ताने निवघेकर घेतात हे एक लोकोपयोगी कार्य आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा