छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राजकीय धर्मनिरपेक्षतेच्या पलिकडेचे - नेते प्रवीण गायकवाड

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

 दि.१९ रोजी मुदखेड शहरातील  आस्था निराधार निराश्रीत आश्रमात कु.श्रद्धा बारतोंडे यांच्या हिंदू एकता जाणीव जागृती महिला बचत गटाच्या वतिने शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 या विचार सभेस भाजपा मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा अरधापुर नप विरोधी पक्षनेते,विधिज्ञ किशोर देशमुख,मुदखेड नपा गटनेते तथा कॉंग्रेस शहराध्यक्ष माधव पाटिल कदम,माजी नगराध्यक्ष सुनिल शेटे,कृषि ऊ.बा.समिती मुदखेडचे संचालक सुरेश शेटे,मधुकर हौसरे,नगर सेवक इमरान मच्छीवाले,माजी नगर सेवक कैलास गोडसे,जनान बंदी आंदोलनाचे नेते डॉ.किरण देशमुख,शिवसेना शहर प्रमुख सचिन माने,डॉ.लासोनकर,डॉ.संदीप पचलींग,नितीन गोडसे,भाजपचे अमोल अबादार,अमोल अडकीने,कालिदास जंगीलवड,राहूल कोठेवाड,शिवा एडके,अभिजीत नातेवाड,सचिन टेकले आदी उपस्थित होते.


यावेळी माधव कदम,डॉ.किरण देशमुख,प्रवीण गायकवाड,कैलास गोडसे यांचे शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर समायोचीत भाषणे झाली.

या वेळी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की,शिवाजी राजांच्या विचार आणि कार्याला शब्दांच्या श्रंखलेत गुंफने एक मोठे आव्हान आहे.राजांचे विचार आणि कार्य शब्दांच्या पलीकडे होते.राजांचा इतिहास उलघडतांना केवळ अफजल खानाचा वध,युद्ध,शस्त्र,आणि इस्लाम या संज्ञे पुरते महाराजांची मर्यादा नव्हती तर राजे एक कुशल प्रशासक,शास्त्रज्ञ,स्थापत्य अभियंते अशारुपात वारंवार आढळून येतात.राजांची धर्मनिरपेक्षता ही सद्याच्या राजकीय धर्मनिरपेक्षते सारखी नव्हती तर विचारांनी प्रेरित झालेली होती.राजांचे आजोबा मालोजी राजे भोसले इस्लामिक सुफी संत शहा शरिफ यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते.त्यांनी स्वत:च्या मुलांची नांवे शहाजी आणि शरिफजी असे ठेऊन भोसले घराण्याची वैचारिक प्रगल्भता प्रत्यक्षात उतरऊन खर्या धर्मनिरपेक्ष विचारांची उभारणी केली.तोच सामाजिक समतेचा विचार राजांनी स्व कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्यात आवलंबीला यातून राजांचे विचार सद्याच्या राजकीय धर्मनिरपेक्षतेच्या पलिकडले होते असे दिसून येते प्रतिपादन केले.

यावेळी मान्यवरांकडून राजांच्या प्रतिमेचे पुष्प,दीप,धुप पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक राम अबादार यानी केले तर सुत्र संचलन आणि आभार 

सुकृत भोसकर यांनी केले.विचार सभेचे लागलीच अनाथ विद्यार्थ्याच्या मिस्ठान्न भोजन दान पंगतीत रुपांतर झाले आणि शिवजयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या