चोरांच्या सोबत चा एक लागला हाती
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
दि.२०रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या सराफा दुकानातून ४० ग्राम सोन्याची चोरीची घटना दुपारी १२च्या सुमारास घडली आहे.
मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री हनुमान ज्वेलर्समध्ये दुपारी १२ च्या सुमारास गिऱ्हाईक म्हणून तीन व्यक्ती गाडीवर आले होते. त्यातील दोन व्यक्तींनी देवीसाठी मंगळसूत्र पाहिजे असे सांगितले व दुकानदारांनी त्यांना चार ग्राम मंगळसूत्र त्यांना दाखवले त्यातील एकाने गावात जाऊन हे दाखवून आणतो असे सांगितले व त्यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती दुकानात त्यांनी बसवले व दोघेजण गाडीवर बसून ते मंगळसूत्र दाखवण्यासाठी गावात गेली. दुकानदारांनी त्या बसलेल्या व्यक्तीला दहा-पंधरा मिनिटांनंतर विचारले तुमची सोबतची माणसें अजून का आली नाहीत? त्या व्यक्तीने असे सांगितले की मी त्यांना ओळखत नाही असे सांगून तो पण निसटून जाण्याच्या मार्गावर असतानाच दुकानदारांनी त्याला पकडून ठेवले. परंतु त्या दोन व्यक्ती बद्दल तो काहीच माहीत नाही असे वारंवार सांगत होता.
या घटनेची चर्चा गावात होताच अनेक व्यक्ती ही घटना स्थळी पाहण्यासाठी या दुकाना समोर गर्दी केली होती. दुपारी २ पर्यंत या घटनेची चा गुन्हा नोंदवला गेला नाही.

बातमी - मथळा मध्ये लिहिले चार ग्रॅम सोने घेऊन चोर पसार.
उत्तर द्याहटवाखालील सविस्तर बातमीत लिहिले 40 चाळीस ग्रॅम सोन्याची चोरी.
व्यवस्थित बातमी देण्याचा प्रयत्न करा.
चार ग्रॅम ते चाळीस ग्रॅम. एवढी पण तफावत असू नये.