मुदखेडात कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई

नगरपालिका व पोलीस प्रशासन एकवटले





मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

 मुदखेडात कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत असून यासाठी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन एकवटले असून कोरोना संकट वाढत असताना कोरोना नियमावलीचे पालन नकरता बेभान फिरणाऱ्या नागरिकांनवर दंडात्मक कारवाई चा बडगा प्रशासना कडून उपसण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांनी कोरोना संकटापासून वाचण्यासाठी कोरोना नियमाचे पालन काटेकोर पणे मोहीम राबविण्यात यावी असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर मुदखेड नगरपरिषदचे मुख्यअधिकारी रामराजे कापरे  पोलीस निरक्षक महेश शर्मा यांनी कोरोना नियमवलीचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करत दोनशे रुपया पर्यंत चा दंड थोटावला आहे.तसेच कोरोना नियमाचे पालन करत मास्क, सँनिटायझर, वापर करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी बिनामास्क पणे बिनधास्त फिरणाऱ्या चाळीस जनांवर कारवाई करत आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

यावेळी मोहीमेसाठी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले,राजेंद्र वठाने,पोलीस कर्मचारी रवी लोहले,शेख मकसूद, सुनर मुंडे,रामेश्वर वाघमारे, गंगाधर भिसे, अनंत कुलकर्णी, मिसहाब सिध्दीकी,दीपक पवार आदी सह कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली

1 टिप्पणी:

लोकप्रिय बातम्या