![]() |
| दुरावस्था :- मुदखेड तालुक्यातील बारड येथील महावितरण वसाहतीची बखाल दुरावस्था झालेली आहे. |
बारड/ प्रतिनिधी
बारड येथील महावितरण कार्यालय वसाहत पन्नास वर्षा पूर्वीची असल्याने या ठिकाणी महावितरण वसाहातीला घरघर लागली असल्याने लाईनच्या निवासस्थानाची अवस्था बखाल बनल्याने लाईनला राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील बारड महावितरण कार्यालया अंतर्गत बारड सर्कल मधील विस गावाचा कारभार चालवला जातो त्यामुळे कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर असल्याने लाईमन स्टाँप साठी याठिकाणी वसाहत निर्मिती करण्यात आली होती परंतु अनेक वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या लाईमन निवासस्थाने आजच्या स्थितीत बकाल अवस्थेत असुन निवासी घराच्या खिडक्या, पत्रे, भिंतीला भेगा पडल्याअसुन ईमारत खिळखिळी ला आली असल्याने आठ निवासस्थाना पैकी चार निवासस्थानात धोका पतकरत कर्मचारी राहत आहेत तर चार घरे बंद अवस्थेत आहेत बदलत्यावातावरणा मुळे कधी काय घटना घडेल याची राहणाऱ्याना चिंता सतावत आहे.
महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याने वसाहत परिसरात अस्वच्छता असल्याने अनेक समस्या उदभवत असून साप, विंचवाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.
महावितरण कार्यालयाचे कार्यक्षत्र मोठे असल्याने कामदारी बजावण्यासाठी लाईमन कर्मचाऱ्यांना अपडावून करण्याची वेळ आली आहे. रात्री बेरात्री दीवटी असल्याने अनेक वेळा धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
लाईमन कर्मचारी यांच्या कामाचा वाढता ताण लक्षात घेता राहण्यासाठी घरे आवश्यक आहेत परंतु याठिकाणी घराची बकाल अवस्था झाल्यामुळे निवासी लाईनम नसल्याने अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहे याठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी तसेच बकाल झालेल्या वसाहतीला पुनर निर्माण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे.
बारड महावितरण वसाहत ही फार जुनी असून कार्यालय निर्मिती बरोबरच कर्मचारी निवासी घराची निर्मिती झाली आहे सध्या याठिकाणी आठ घरे असून चारे घरे बंद अवस्थेत आहेत
- आर.व्ही. धकाते कनिष्ठ अभियंता बारड ता.मुदखेड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा