कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माळकौठा ग्रामस्थांच्यावतीने निर्माण
संपादक आशिष मुगटकर
मुदखेड तालुका/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.२८/०२/२०२१ ते ७/०३/२०२१ पर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताहा चालनार होता. परंतु राज्यात व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह यावेळी रद्द करण्यात आला आहे असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
परिसरातील सर्व सदभक्त मंडळींनी यावेळीच्या रद्द करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची नोंद घ्यावी असे आवाहन माळकौठा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा