ना मास्कचा वापर, ना सोशल डिस्टन्स
![]() |
| फज्जा :- मुगट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदान वाटप सुरू असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. |
मुगट / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या टप्प्याच्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप संथ गतीने सुरू आहे.
दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा बँकेत येत आहेत.त्यामुळे बँकेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बँकेत जमा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसल्याच प्रकारचे नियम या ठिकाणी पाळले जात नसून सोशल डिस्टन्सचा फज्जा या ठिकाणी उडालेला दिसत आहे.
या शाखेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसल्याच प्रकारची दक्षता घेतली जात नाही.
या ठिकाणी मास किंवा सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चा वापर न करताच बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
या शाखेत शेतकऱ्यांसाठी कसल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.ना बसन्याची,ना पाण्याची सुविधा या ठिकाणी अजिबात नाही. लोकांना बँकेत समोरच ताटकळत पैसे मिळेपर्यंत उभेच राहावे लागते किंवा शेजारच्या घराचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान, जिल्हात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.त्यानंतरही नागरिकांची बेफिकीरी कायम आहे.जर अशीच परिस्थिती राहिली तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा