जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज दाखल

 राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस, शिवसेना,भाजपा यांचा समावेश

संपादक आशिष मुगटकर


नांदेड/ प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असणारी निवडणूक म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकी  कडे बघितले जाते.या निवडणूकी ची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणूकीसाठी विविध पक्षा कडून उमेदवार अर्ज दाखल केले जात आहेत.

याच निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी आपला नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांच्या कडे दाखल केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश चे वसंत सुगावे, जिल्हा परिषद सदस्य अँड.विजय धोंडगे, जीवनराव पाटील घोगरे, माधवराव पवार, दिगंबर पेठकर अंबादास देशमुख, शंकरराव कदम, मधुकरराव पाटील बनसोडे, दिगंबर सोनवळके, रेखा राहिरे, बालाजी माटोरे, श्रीकांत मांजरमकर, बाळासाहेब भोसिकर, रवींद्र सिंग पुजारी, शिवानंद शिप्परकर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक अनुषंगाने मुदखेड तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर व शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी निवडणूक अधिकारी लतिफ पठाण यांच्याकडे दाखल केला.


 उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, माणिक लोमटे, पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर, श्रीकांत पावडे,शाम वानखेडे, शिवाजी देशमुख सह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या