मुगट गोदावरी नदीतून अवैध वाळूचा उपसा बंद करून वाळू माफिया कारवाही करा ; सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मुगट गोदावरी नदीतून अवैध वाळूचा उपसा बंद करून वाळू माफिया कारवाही करा ; सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ मुगट वार्ताहार मुगट परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून बोटिंग मशीनच्या साह्याने खुलेआमपणे अवैध मार्गाने होणारा वाळूचा उपसा व वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदन देऊन सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे केली आहे. 

 मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातून  गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया कडून अवैध वाळू उपसा बोटिंग मशीनच्या साह्याने खुलेआम पणे केला जात आहे.त्यामुळे मातासाहब देवाजी गुरुद्वाराच्या मागच्या संरक्षण भिंतीला तडे पडत असुन ती पडण्याची शक्यता आहे. 

तालुक्यातील मुगट, ब्राह्मणवाडा, या भागात चार ते पाच बोटिंग मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा दिवस रात्र केला जात आहे.मुदखेड महसूल कडून धातुरमातुर कारवाई केली जात आहे. 

मुगट परिसरात महसूल प्रशासनाची कारवाई १०ते १२ दिवसा पूर्वीच केली होती.पण त्यात केवळ तीन तराफे हाती लागले होते. कारवाई करुन १०/१२दिवस होताच पुन्हा वाळूचा उपसा वाळू माफिया कडून सुरू केला आहे या भागातुन दररोज १५ ते २० हायवा, टिप्परच्या साहाय्याने मुगट मार्गाने बारड, मुदखेडला,तर ब्राम्हवाडा मार्गने नांदेडहून दुसऱ्या जिल्हात पाठवली जात आहे.

मातासाहब देवाजी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे.अशी अनेक वृत्त पत्रात सुध्दा बातमी प्रसिद्ध झाली होती.या ठिकाणच्या वाळू उपसामुळे मागील संरक्षण भिंतीला तडे पडत आहेत.असाच उपसा या ठिकाणी सुरू राहीला तर ती संरक्षणभिंत खचुन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.संरक्षण भिंत पडलीतर गुरुद्वाराची मोठी नुकसान होऊ शकते. दि.२रोजी मी वाळू माफियांना सांगितले की या ठिकाणचा वाळूचा उपसा बंद करा पण त्यानेच मलाच उलट अरे रावीची भाषा वापरुन मलाच दमदाटी केली. 

मुदखेड तालुक्यातील अवैध मार्गाने होणारा गोदावरी नदीच्या पात्रातील अवैध वाळुचा उपसा तात्काळ थांबवून वाळुमाफियांवर कडक कारवाई करण्यात यावी. शासनाच्या धोरणा प्रमाणे घरकुलासाठी मुदखेड तालुक्यातील गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या