मुगट जिल्हा परिषद शाळेत शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 
 दि.२८रोजी मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकराव चव्हाण ,मा.आमदार अमिताभाभी चव्हाण व युवा आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय डॉ.शंकररावजी चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाकाळाच्या नंतर पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाला या वर्षी पासून सुरूवात करण्यात आली. हे वाटप भोकरमतदार संघातील तीन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे.

शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. 


या प्रसंगी मुदखेड भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष, दत्तराव देशमुख, मा.जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील कल्याणे,मा. जिल्हा परिषद सदस्य विलास हाटकर, मुगट ग्रामपंचायतचे सरपंच धोंडीबा वंजे, संचालक माधवराव पाटील कल्याणे, सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन माधवराव पाटील कल्याणे, मुगट ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील मुंगल, तुकाराम हाटकर, देवदत्त हाटकर , बालाजी मुंगल, राजू पाटील मुंगल, राजू गणेशराव कल्याणे, दिगंबरराव कदम, शिवानंद पाटील कल्याणे, साईनाथ पांचाळ, कृष्णा कल्याणे, अवधूत पाटील उपासे, दिगंबरराव कल्याणे वासरीकर, पत्रकार आशिष पाटील कल्याणे ,शाळेतील शिक्षक वृंद आदी मंडळी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या